जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील देशीदारूच्या दुकानावर मस्करी केल्याच्या कारणावरून एकाला चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत रात्री ११ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील जिजाऊ नगरात गजानन शेनफळू बोंढरे वय ५४ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देशी दारूच्या दुकानाजवळ मस्करी केल्याच्या रागातून संशयित आरोपी भिका मराठे, बाळू चव्हाण, मदन चव्हाण आणि राहूल चव्हाण सर्व रा. आंबिलहोळ ता. जामनेर यांनी शिवीगाळ करत गजानन बोंढरे यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली.

याप्रकरणी गजानन बोंढरे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे संशयित आरोपी भिका मराठे, बाळू चव्हाण, मदन चव्हाण आणि राहूल चव्हाण सर्व रा. आंबिलहोळ ता. जामनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास महाजन हे करीत आहे.



