Home क्राईम घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात एका २७ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. राहत्या घरात घुसून महिलेशी गैरवर्तन करत तिचा हात पकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागात ही २७ वर्षीय पीडित महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महिला आपल्या घरात असताना संशयित आरोपी धनराज कनैय्यालाल कुकरेजा हा अचानक घरात शिरला. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने महिलेशी अश्लील संवाद साधत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

संशयित आरोपी धनराज कुकरेजा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित महिलेचा हात पकडून तिला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केला. या अनपेक्षित प्रकारामुळे महिला सुरुवातीला हादरून गेली, मात्र तिने धीर एकवटून कुटुंबाला याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी रात्री ११ वाजता संशयित आरोपी धनराज कनैय्यालाल कुकरेजा याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी हे करीत आहेत.


Protected Content

Play sound