Home क्राईम उभ्या वाहनाला भीषण आग ; लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

उभ्या वाहनाला भीषण आग ; लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात एका उभ्या असलेल्या वाहनाला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लागलेल्या या आगीत वाहनासह त्यातील महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे २ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल शंकर गवळी (वय २५, रा. जुना नाका, हिरापूर रोड) यांनी आपले वाहन (मारुती सुपर कॅरी, क्र. एम.एच. ५२-४३७७) राहत्या घरासमोर रस्त्यावर उभे केले होते. बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वाहनाच्या आतील वायरिंगमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे काही क्षणातच वाहनाने पेट घेतला.

या आगीत वाहनाचे इंजिन, केबिन, डॅशबोर्ड, दोन्ही बाजूच्या सीट, टायर आणि बॅटरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तसेच वाहनामध्ये असलेले १२ हजार रुपये किमतीचे धान्य (६ पोते) आणि फिर्यादीचा ४० हजार रुपये किमतीचा सॅमसंग फोल्ड मोबाईल देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत एकूण २ लाख ८७ हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय महाजन हे करीत आहे.


Protected Content

Play sound