Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

अमळनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

0
102


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत दोन घरे फोडून लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. एवढेच नव्हे तर पळून जाण्यासाठी चोरट्यांनी एका ग्रामस्थाची मोटारसायकलही लंपास केली आहे. याबाबत मंगळवारी ११ फेब्रुवारी रेाजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी कल्पेश गोकुळ माळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील तीन बंद घरांना लक्ष्य केले. पहिली चोरी भिकुबाई माळी यांच्या घरात झाली, जिथून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. त्यानंतर प्रतिभाबाई जयवंत भदाणे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची नासधूस करण्यात आली. चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम सोने आणि २४ हजार रुपये किमतीची चांदी तसेच ४ हजार रूपयांची रोकड रुपये रोख असा एकूण ५८,००० रुपयांचा मुद्देमाल घरातून लंपास केला.

घरातील चोरी आटोपल्यानंतर चोरट्यांनी बाहेर उभी असलेली महेंद्र माळी यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच १९ एल ८६३) चोरून पोबारा केला. दोन्ही ठिकाण चोरी करून एकुण ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी विजय भोई हे करीत आहे.


Protected Content

Play sound