Home क्राईम चाळीसगावात किरणा दुकान फोडून दीड लाखांचा ऐवज लांबविला

चाळीसगावात किरणा दुकान फोडून दीड लाखांचा ऐवज लांबविला


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील खडकी बायपास परिसरातील एका नामांकित किराणा दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला आहे. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील खडकी बायपास परिसरात प्रभाकर त्र्यंबक कातकर (वय ६२ वर्ष) हे वास्तव्याला असून त्यांचे बायपास रोडवर ‘आशापुरी माता प्रोव्हीजन’ नावाचे दुकान आहे. १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. चोरट्यांनी थेट दुकानातील कॅश काउंटर (ड्रॉवर) लक्ष्य केले. त्यामध्ये ठेवलेल्या ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांच्या बंडलसह एकूण दीड लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले.

सकाळी जेव्हा कातकर दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना कुलूप तुटलेले दिसले आणि दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. ड्रॉवरची तपासणी केली असता रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Protected Content

Play sound