पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भरधाव ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील ४० वर्षीय शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उत्राण ते भातखंडे बुद्रुक ता. भडगाव दरम्यान घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने कासोदा पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे.
समाधान काशिनाथ पाटील (वय – ४० वर्ष रा. उत्राण ) हे शेत मजुरी करुन आपला व परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. समाधान पाटील हे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उत्राण येथुन गिरड येथे त्यांचे भाच्याला मुलगा झाला असल्याने बघण्यासाठी येथे होते. दरम्यान उत्राण ते भातखंडे बुद्रुक ता. भडगाव दरम्यान समोरून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने समाधान पाटील यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात समाधान पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवन्या रुग्णवाहिका चालक संजय पाटील, बंटी पाटील यांनी समाधान पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने कासोदा पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे.
रात्री उशिरापर्यंत कासोदा पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालकाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मयत समाधान पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचे समाधान पाटील यांचे अपघाती मृत्यूने उत्राण, गिरड परिसरात शोककळा पसरली आहे.



