Home Cities जळगाव भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्साहात

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्साहात

0
102


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून जळगाव येथील भिरूड परिवारातर्फे धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. अध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात श्रद्धा आणि भक्तीची अनुभूती निर्माण झाली होती.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील निवासी संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गजानन महाराजांची महाआरती करण्यात आली. रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड व सौ. मंजुषा भिरूड, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, रजिस्ट्रार प्रमोद व सौ. ज्योत्स्ना भिरूड, लेखापाल योगेश व सौ. नूतन पाटील, विकास व सौ. संगीता बेंडाळे, किशोर व सौ. किर्ती झांबरे, एन. जी. चौधरी व सौ. स्मिता चौधरी, गोपाळ व सौ. भोळे या दाम्पत्यांच्या हस्ते ही महाआरती संपन्न झाली.

या वेळी प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, जगन्नाथ भिरूड यांच्यासह परिसरातील रहिवासी, कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर संत गजानन महाराजांची भजनगीते सादर करण्यात आली. “गण गण गणांत बोते” या नामस्मरणात भाविक तल्लीन झाले होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांनी पिठलं-भाकरी या पारंपरिक प्रसादाचा लाभ घेतला. भक्ती, सेवा आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणारा हा प्रगटदिन सोहळा अत्यंत शांत आणि मंगल वातावरणात पार पडला.


Protected Content

Play sound