Home Cities जळगाव नवीन बस स्थानक रोडवरील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

नवीन बस स्थानक रोडवरील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

0
181


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नवीन बस स्थानक रोडवरील रस्त्याच्या कामाने अखेर वेग घेतला असून, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारील सुमारे १८० मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून, उद्यापर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ते स्टेट बँक ऑफ इंडिया या दरम्यान सुरू असलेले सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, संबंधित मक्तेदारांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात स्टेट बँक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत, कोर्ट चौकापर्यंत रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले असल्याने या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती. खड्डेमय व उखडलेल्या रस्त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या. त्यामुळे स्थानिक व्यापारी, वाहनचालक व रहिवासी त्रस्त झाले होते.


Protected Content

Play sound