मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | डॉ. होमी भाभा फाउंडेशन (मुंबई), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), श्रीहरीकोटा तसेच मुक्ताईनगर येथील श्री मंगेश निळे सरांच्या श्री समर्थ सायन्स क्लासेस – निळे कोचिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मुक्ताईनगर व परिसरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून तृतीय क्रमांक प्राप्त करणारे चिरंजीव शौर्य नरेंद्र वराडे यांची बाल वैज्ञानिक पुरस्कारासाठ निवड झाली आहे. तसेच भुसावळ विभागातून, इयत्ता आठवीतील विद्यार्थी चिरंजीव समर्थ शिवाजीराव वंजारी यांची दुसऱ्यांदा बाल वैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मुलींच्या गटातून जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी कुमारी कृष्णाली संदीप पालवे तसेच जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवणारी कुमारी प्रांजल सचिन महाजन या विद्यार्थिनींचीही बाल वैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पैकी शौर्य नरेंद्र वराडे याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), श्रीहरीकोटा येथे शैक्षणिक भेट देण्यासाठी निवड झाल्याने मुक्ताईनगर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
या यशामागे डॉ. होमी भाभा फाउंडेशन, इस्रो श्रीहरीकोटा तसेच श्री मंगेश निळे सरांचे श्री समर्थ सायन्स क्लासेस – निळे कोचिंग अकॅडमी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, विशेष म्हणजे निवड झालेले सर्व विद्यार्थी हे निळे सरांच्या क्लासचेच विद्यार्थी आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



