पाचोरा येथे अचानक आलेल्या पावसाने उडाली नागरिकांची धांदल

WhatsApp Image 2019 07 25 at 12.41.17 PM

पाचोरा, प्रतिनिधी |  आज गुरुवार रोजी सकाळी ११.४० मी पावसाला जोरदार सुरवात झाली. सकाळी ऊन होते तर अर्ध्या तासातच अचानक ढगाळ वातावरण होऊन  पावसास सुरुवात झाली.

 

अचानक पाऊस आल्याने बाजारपेठेत व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.  शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी पावसात भिजून आनंद व्यक्त केला. तर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी पावसापासून बचावासाठी चहा टपरी, दुकान यांचा आसरा घेतला. अचानक पाऊस आल्याने सर्वांचीच धांदल उडाल्याचे पहावयास मिळाले.

Protected Content