Home क्राईम अट्रावल यात्रेत पाच महिलांच्या सोनसाखळ्या लांबविल्या !

अट्रावल यात्रेत पाच महिलांच्या सोनसाखळ्या लांबविल्या !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल परिसरात भरलेल्या मुंजोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र आणि पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मंदाकिनी मुकेश गजरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार महिला यात्रेसाठी गेल्या होत्या. गर्दीच्या ठिकाणी अज्ञात आरोपीने या पाचही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अत्यंत शिताफीने चोरले. यामध्ये मंदाकिनी गजरे, राखी सुरवाडे, रुपाली कोळी, रोहिणी जाधव आणि स्वाती वराडे यांच्या मंगळसूत्रांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ५६ हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेंद्र बागुले हे पुढील तपास करीत आहे.


Protected Content

Play sound