Home Cities एरंडोल बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची झडप ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची झडप ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

0
137

एरंडोल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह सुमारे २ लाख ५४ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताडे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी आकाश बनकर यांना हनुमंतखेडे शिवारात बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. खुशी हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 4993) थांबवले असता, त्यामध्ये एक ब्रास वाळू मिळून आली. याप्रकरणी चालक व मालक विक्की पितांबर पाटील (वय १९, रा. हनुमंतखेडे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound