भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील साकरी (मिरगव्हाण) येथे दोन मुलींना विहिरीत ढकलल्याच्या संशयावरून एका मोठ्या जमावाने घरांवर हल्ला करून तोडफोड केल्याची घटना २७ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी ३० जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ ते २० अज्ञात इसमांच्या जमावाने संगनमत करून नरेंद्र चौधरी आणि सतीश वारके यांच्या घरांवर दगडफेक केली. संतापलेल्या जमावाने घरामध्ये घुसून जीवनावश्यक वस्तूंची तोडफोड केली आणि काही वस्तू जाळून टाकल्या. या हल्ल्यात घरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पुन्हा गावात दिसल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. भुसावळ तालका पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.




