Home करियर जळगावात होणार पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

जळगावात होणार पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

0
114

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पदवी प्रधान सभागृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे होणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नामांकीत खाजगी आस्थापना, उद्योजक व कंपन्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून त्यांच्या आस्थापनांतील रिक्त पदांची माहिती “जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाईन क्र. ४ ” या पर्यायांतर्गत ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अथवा अडचणी असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound