जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी एका अनियंत्रित ट्रॅक्टरने महामार्गावर वळण घेत असतांनना ट्रॅक्टरचे ट्रॉली हे पटली झाली आहे. यात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचा माल खाली करून ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 8416) भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटमधून बाहेर पडत होते. मार्केटमधून बाहेर आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हे ट्रॅक्टर अचानक रस्त्यावरच पलटी झाले. सकाळी १० ची वेळ असल्याने बाजार समितीच्या परिसरात मोठी गर्दी होती. ट्रॅक्टर पलटी झाल्याने मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच धावपळ उडाली.

या अपघातात चालकाला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाही, हा मोठा दिलासा ठरला. मात्र, महामार्गाच्या मध्यभागी ट्रॅक्टर आडवे झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर नागरीकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत झाली.



