भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील बडी धर्मशाळा जवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सागर राजकुमार कुकरेजा (वय २६, रा. सिंधी कॉलनी) हे २७ जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास बडी धरमशाळा कडून जात असताना, संशयित आरोपी नारायण थारवानी, रवी थारवानी आणि पवन थारवानी यांनी त्यांना अडविले. “तू माझा काय वाकडं करतो,” असे म्हणत आरोपींनी सागर यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

शाब्दिक चकमक वाढल्यानंतर आरोपी नारायण थारवानी याने आपल्या खिशातील टोकदार चाकू काढून सागर यांच्या डोक्यावर आणि कानावर वार केले. यावेळी सागर यांच्यासोबत असलेल्या गौरव कुकरेजा यालाही तिघांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सागर कुकरेजा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी सागर कुकरेजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी नारायण थारवानी, रवी थारवानी आणि पवन थारवानी तिघे राहणार सिंधी कॉलनी, भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी जितेंद्र पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



