Home Cities जळगाव प्रजासत्ताक दिन : पालकमंत्री गुलाबराव पाटील करणार ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिन : पालकमंत्री गुलाबराव पाटील करणार ध्वजारोहण


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोमवारी (२६ जानेवारी) जिल्ह्यात उत्साहात साजरा होणार आहे. जळगाव येथील पोलीस मुख्यालय, पोलीस कवायत मैदानावर सकाळी ठीक ९.१५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांचे विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळ्याला स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा प्रशासनाने शहरातील इतर संस्था आणि कार्यालयांसाठी ध्वजारोहणाच्या वेळेबाबत विशेष सूचना जारी केल्या आहेत: जळगाव शहरातील नागरिकांना मुख्य शासकीय सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी सकाळी ८.३० ते १०.०० या वेळेत कोणत्याही कार्यालयाने किंवा संस्थेने स्वतःचे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नयेत. ज्यांना स्वतःचा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यांनी तो सकाळी ८.३० च्या पूर्वी किंवा १०.०० च्या नंतर आयोजित करावा, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound