चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत जळगावातील महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २१ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी २२ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना विजय चव्हाण वय ४६ रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, सपना चव्हाण या महिला जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला होत्या. त्याची मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा येथे दिली असल्याने त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी त्या बुधवारी २१ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता जात होत्या. त्यावेळी बेलगंगा गावाजवळ रस्ता ओलांडत असतांना चाळीसगावकडून मालेगाव कडे जाणारी भरधाव बस क्रमांक एमएच ४९ बीझेड ९०२० ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सपना चव्हाण या जागीच ठार झाल्या. याप्रकरणी त्यांची जावई शंकर गोपाल नाय रा. बेलगंगा ता. चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक लक्ष्मण सुधाकर म्हस्के रा. छत्रपती संभाजी नगर, जळगाव याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील हे करीत आहे.




