Home क्राईम धक्कादायक : आंघोळीचे व्हिडीओ काढून महिला व तिच्या मुलीचा विनयभंग

धक्कादायक : आंघोळीचे व्हिडीओ काढून महिला व तिच्या मुलीचा विनयभंग

0
223


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिला व तिच्या मुलीचे आंघोळ करतांना व्हिडीओ बनवून विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव एमआयडीसीतील एका भागात ३८ वर्षीय महिला ही आपल्या मुलीसह वास्तव्याला आहेत. दरम्यान राहत असलेल्या बिल्डींगच्या सिमेंट पत्र्याला होल पाडून संशयित आरोपी पुरूषोत्तम निवृत्ती कुटे रा. केशव नगर, ता. रिसोड जि.वाशीम याने महिला व तिची मुलगी आंघोळ करतांना मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून घेतले. त्यानंतर दोघांचा विनयभंग केला. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी पुरूषोत्तम कुटे या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.


Protected Content

Play sound