Home क्राईम सबगव्हाण शिवरातील शेतातून सोलार पॅनलची चोरी ; शेतकऱ्याचे २५ हजारांचे नुकसान

सबगव्हाण शिवरातील शेतातून सोलार पॅनलची चोरी ; शेतकऱ्याचे २५ हजारांचे नुकसान


पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील सबगव्हाण शिवारातील शेतातून सोलार पॅनलची २५ हजार रूपये किंमतीचे पॅनलची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षल बाळू ठाकूर रा. बहाळ ता. चाळीसगाव यांचे पारोळा तालुक्यातील सबगव्हाण शिवारात शेट गट नंबर ९६ मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीजवळ एचपी सोलार पॅनल देखील बसविण्यात आले आहे. १९ ते २० जानेवारी रोजीच्या कालावधीमध्ये त्यांच्या शेतात लावलेले सोलार पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी २० जानेवारी रोजी उघडकीला आला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ कैलास साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound