Home क्राईम वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई ; गुन्हा दाखल

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई ; गुन्हा दाखल


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसरातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीसांनी कारवाई करत वाळूचे वाहन जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता केली. याबाबत दुपारी २ वाजता पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर शहरातील पशू वैद्यकीय दवाखाना परिसरातून अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी २० जानेवारी सकाळी ११ वाजता कारवाई करत वाळूची ट्रॅक्टर पकडले. यावेळी चालक संदीप भिवसन गायकवाड वय २५ रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा याला वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलीसांनी सदरील वाहन जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक संदीप गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण ब्राम्हणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound