जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विठ्ठलवाडी परिसरात एका घरात धाडसी घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी २० जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी परिसरातील गट नं. ९७ मधील प्लॉट नं. ४ मध्ये दुर्योधन बाबूराव साळुंखे (वय-५६) हे आपल्या कुटुंबासह राहतात. २० जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास, जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून सोन्याचे, चांदीचे दागिने, मुर्ती, पितळी भांडे आणि २० हजारांची रोकड असा एकुण ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याघटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.




