Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

0
110


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मुलीचा कसून शोध घेत आहेत.

जळगाव शहरातील एका भागात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना १५ जानेवारी रोजी समोर आली आहे. पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुनहा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी आम्रपाली पालवे हे करीत आहे.


Protected Content

Play sound