Home धर्म-समाज लेवा पाटीदार समाज वाकडचे स्नेह संमेलन उत्साहात; ३५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

लेवा पाटीदार समाज वाकडचे स्नेह संमेलन उत्साहात; ३५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान


पिंपरी-चिंचवड—लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लेवा पाटीदार समाज वाकडच्या वतीने आयोजित पाचवे वार्षिक स्नेह संमेलन १८ जानेवारी रोजी रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला सामाजिक एकतेचा आणि प्रेरणेचा रंग लाभला. महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देत त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने यंदा ‘लेवा विमेन अॅचिव्हर्स २०२६’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ अध्यक्षअरुण बोरोले, गोदावरी फाउंडेशन संचालक व भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील , मुंबई उपायुक्त पोलीस, सचिन बधे , भाजपा, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सत्तारूढ नेते नामदेवदादा ढाके, जळगाव लेवा समाज अध्यक्ष व एलएमसी चेअरमन डॉ. मिलिंददादा चौधरी आणि उद्योजिका भंगाळे गोल्ड अँड सिल्कच्या सुरेखा भंगाळे उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी विचारांनी समाजबांधवांना मार्गदर्शन करत सोहळ्याची उंची वाढवली.

हळदी-कुंकू व बोरन्हान या पारंपरिक सोहळ्यांनंतर प्रायोजक व विविध लेवा मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांच्या संकल्पनेतून शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योजकता, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३५ कर्तृत्ववान महिलांना ‘Leva Womens Achievers 2026’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मंडळाचे सचिव गौरव भंगाळे यांनी कार्यकारिणीतील महिलांचा सन्मान करत सर्वांचे आभार मानले.

सांस्कृतिक कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपले कला-कौशल्य सादर केले. याच वेळी लेवा समाजाचे पहिले ई-मॅगझिन ‘लेवा प्रतिबिंब’ (#गो-ग्रीन) या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. हे ई-मॅगझिन रक्षा चौधरी, शीतल पाटील, गिरीश भारंबे, सौ. कल्याणी भारंबे, जागृती फेगडे व डॉ. पियुष चौधरी यांच्या अथक परिश्रमातून साकार झाले असून समाजाच्या डिजिटल वाटचालीला नवे दालन खुले करणारे ठरले.

कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांनी ‘Leva Womens Achievers 2026’ पुरस्काराचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, सामाजिक क्षेत्रात महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सन्मानित महिलांच्या कार्यातून समाजाला नवी प्रेरणा मिळते आणि भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे कर्तृत्ववानांना पुढे आणण्यासाठी मंडळ कटिबद्ध राहील, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंदन महाजन, विजय फालक, नीलेश धांडे, गुणेश महाजन, राहुल झांबरे, लोकेश नेहेते, अंकुश चौधरी, संगीता चौधरी, स्मिता कोल्हे, सपना बधे, अतुल चौधरी, जयंत चौधरी, ई-मॅगझिन टीम व सर्व सहकार्यांनी मोलाचे योगदान दिले. उपस्थितांनी खानदेशी भरीत-पुरी, कढी व गुळाची जिलेबीचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम आणि सांस्कृतिक उत्सवांतून समाजसेवेला नवे आयाम मिळाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.


Protected Content

Play sound