अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते टाकरखेडा दरम्यानच्या डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी अंदाजे ३० वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याबाबत दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमळनेर ते टाकरखेडा दरम्यानच्या रेल्वे लाईन खंबा क्रमांक (२५७/२०) जवळ एका अनोखळी अंदाजे ३० वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर रेल्वेचे लोकापायलट याने टाकरखेडा येथील स्टेशन अधिक्षक यांनी फोन करून माहिती दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून घेवून पंचनामा केला. त्यानंतर पोलीसांनी मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. मयताची अद्याप कोणतीही ओळख पटलेली नाही. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.




