Home क्राईम मध्यरात्री अग्नी तांडव: चार ‘चायनीज’ हातगाड्यांसह फर्निचर जळून खाक

मध्यरात्री अग्नी तांडव: चार ‘चायनीज’ हातगाड्यांसह फर्निचर जळून खाक


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील शासकीय आयटीआय परिसरातील रस्त्यालगत लावल्या जाणाऱ्या चार चायनीज हातगाड्यांना काही टवाळखोरांनी कारण नसताना आग लागल्याची घटना सोमवारी १९ जानेवारी रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत गाड्यांवरील साहित्य, टेबल आणि खुर्च्या जळून खाक झाल्या असून गरिबांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी १९ जानेवारी रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली. परिसरातून धूर आणि आगीचे लोळ निघत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत आगीची तीव्रता इतकी होती की चारही हातगाड्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यामध्ये कच्चा माल, गॅस शेगड्या आणि फर्निचर पूर्णपणे कोळसा झाले आहे.

आगीचे नेमके कारण तांत्रिक बिघाड की घातपात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पीडित हातगाडी मालकांनी हा प्रकार टवाळखोरांनी मुद्दाम केल्याचा संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही दोन ते तीन वेळा अशाच प्रकारे आगीच्या घटना घडल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.


Protected Content

Play sound