Home Cities एरंडोल भरधाव दुचाकीवरून घसरून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

भरधाव दुचाकीवरून घसरून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू


एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा-आडगाव रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकी रस्त्याखाली घसरून झालेल्या या भीषण अपघातात ४४ वर्षीय धनराज जयराम पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारीरोजी रात्री १० वाजेच्या सुमारास धनराज जयराम पाटील (रा. आडगाव) हे त्यांच्या मित्र कैलास वना पाटील यांच्या सोबत हिरो होंडा स्पलेंडर दुचाकीने (क्र. MH.१९.DX.२२६०) कासोदाकडून आडगावकडे जात होते. कासोदा-आडगाव रोडवरील दग्र्याजवळ ही दुचाकी आली असता, चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव वेगात चालवली.

गंभीर दुखापत आणि मृत्यू वेग जास्त असल्याने दुचाकी अचानक रस्त्याखाली उतरली आणि जोरात आदळली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले धनराज पाटील यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक कैलास वना पाटील हे देखील जखमी झाले आहेत. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कासोदा पोलीस ठाण्यात चालक कैलास पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Protected Content

Play sound