यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आगामी २३ जानेवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त यावल शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ‘जयंती उत्सव समिती’ची सर्वानुमते स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी तरुण कार्यकर्ते राहुल राजेंद्र कचरे यांची निवड करण्यात आली आहे.

समितीची नवीन कार्यकारिणी :
उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी नरेंद्र शिंदे, खजिनदारपदी गौरव जोशी, तर सचिवपदी नरेंद्र (खन्ना) माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सदस्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली असून, यामध्ये मयूर खर्चे, सारंग बेहेडे, मनोज करनकर, पिंटू कुंभार, योगेश राजपूत पाटील, अजहर खाटीक, राहुल पवार, भूषण खैरे, किशोर (गोलू) माळी आणि जयेश तुकाराम बारी यांचा समावेश आहे.

अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन :
कार्यक्रमात पारदर्शकता आणि भव्यता यावी यासाठी एका वजनदार सल्लागार समितीचीही निर्मिती करण्यात आली आहे. यात नगराध्यक्षा सौ. छाया पाटील, तालुका प्रमुख शरद कोळी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, नगरसेवक सागर चौधरी, नगरसेविका सौ. वैशाली बारी यांच्यासह पप्पू जोशी, संतोष खर्चे, योगेश चौधरी, विजय पंडित, प्रल्हाद बारी आणि हारून खान हे मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीत शिवसैनिकांचा उत्साह :
या बैठकीचे प्रास्ताविक शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले. त्यांनी २३ जानेवारी रोजी होणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा मांडली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि जयंतीचा उत्सव जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.



