जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पायघन हॉस्पिटलसमोर जुन्या वादातून एका तरूणाला दोन जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत गोपाल गागळे वय १९ रा. कंजरवाडा, जळगाव हा तरूण बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घराजवळील सप्तश्रृंगी माता मंदीराजवळ उभा होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून गोविंद सागर गागळे आणि गोलू सागर गागळे दोन्ही रा. कंजरवाडा, यांनी प्रशांत याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रशांत जखमी झाल्याने त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यात आले. याप्रकरणी प्रशांत गागळे याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे गोविंद गागळे आणि गोलू गागळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विनोद भोळे हे करीत आहे.




