Home क्राईम संतापजनक : अश्लिल कृत्य करत महिलेचा विनयभंग !

संतापजनक : अश्लिल कृत्य करत महिलेचा विनयभंग !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात एक संतापजनक घटना समोर आली असून, घरासमोर राहणाऱ्या एका नराधमाने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विजय मुरलीधर सोनवणे याच्याविरुद्ध रविवारी ४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील नंदगावात महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या रविवारी ४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या जिन्याजवळ फोनवर बोलण्यासाठी गेल्या होत्या. फोनवर बोलणे झाल्यानंतर त्या जिन्यावरून खाली उतरत असताना, समोरच राहणारा आरोपी विजय मुरलीधर सोनवणे याने त्यांना पाहिले. संशयित आरोपीने फिर्यादी महिलेला पाहून डोळा मारला व हाताने खुणावत आपल्याकडे बोलावण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता, आरोपीने थेट फिर्यादीच्या घराच्या जिन्याजवळ जाऊन त्यांचा हात पकडला आणि अश्लील चाळे करू लागला. आरोपीच्या या कृत्यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक चौधरी करत आहेत.


Protected Content

Play sound