Home Cities यावल यावल नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष छाया पाटील ‘एक्शन मोड’मध्ये; कामांचा आढावा

यावल नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष छाया पाटील ‘एक्शन मोड’मध्ये; कामांचा आढावा


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांनी पदाची सूत्रे हाती घेतताच कामाला सुरुवात केली असून त्या ‘एक्शन मोड’मध्ये आल्या आहेत. आज त्यांनी नगरपालिकेत प्रत्यक्ष उपस्थित राहून मागील सर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला.

नगराध्यक्ष सौ. छाया पाटील यांनी जनसेवेच्या कारभाराची औपचारिक सुरुवात करताना नगरपालिकेच्या सर्व विभागांकडून विभागनिहाय माहिती घेतली. यावेळी सहमुख्याधिकारी रविकांत डांगे, पाणीपुरवठा विभागाच्या अनुराधा कमलेश पाटील, बांधकाम व प्रभारी स्वच्छता विभागाचे अधिकारी संग्राम शेळके यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावल शहरासाठी मंजूर झालेल्या ५६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांचा नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणीदरम्यान माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक पराग सराफ, नगरसेविका सौ. वैशाली बारी यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच शहरात सुरू असलेली सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही नगराध्यक्ष छाया पाटील यांनी दिल्या.


Protected Content

Play sound