चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यात किशोर पाटील युवा मंचतर्फे भाजपा सदस्य व नवमतदार नोंदणी अभियानाला नुकतीच सुरवात करण्यात आली आहे.
तालुक्यातून जास्तीत जास्त भाजपा सभासद नोंदणी व नवमतदार नोंदणी व्हावी, यासाठी हा युवा मंच प्रयत्नशील आहे.
हे अभियान शहर तसेच तालुक्यातील प्रत्येक जि.प. गटामधील प्रत्येक गावात राबवण्यात येत आहे. अभियानासाठी दोन वाहने माहिती देणे व नोंदणी करणे याकामी नेमण्यात आली आहेत. ही वाहने ११ ऑगस्ट २०१९ पर्यंत जास्तीत जास्त नोंदणी साठी प्रयत्नशील असतील. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात दिनेश बोरसे, डॉ. महेंद्र राठोड, प्रा. सचिन दायमा, के.बी. साळुंखे, घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील, प्रा. सुनील निकम, धनंजय सुखदेव मांडोळे, रोहन सूर्यवंशी, अक्षय मराठे, अॅड. प्रशांत पालवे, अमोल नाणकर व किशोर पाटील ढोमणेकर याच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.