जळगाव, प्रतिनिधी | शहरातून जाणाऱ्या महामार्गावर आज (दि.२३) दुपारी एका टॅन्करने एका मोटार सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात मोटार सायकलचे बरेच नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ हा अपघात घडला असून टॅन्कर (क्र. एम.एच. ४६, एच. ७७८७) ने दुपारी मोटार सायकल (क्र. एम.एच. १९, डी.के. ५७६३) ला धडक पाठीमागून दिली. या अपघातात किती जण मृत अथवा जखमी झाले आहेत, याबाबत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.