नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्रीसाठी घरात मिळून आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ८० किलो मांस जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावातील निचवास मोहल्ला परिसरात राहणारा सलीम खान हयात खान वय ६५ हा त्यांच्या घरातील वाड्यात ८० किलो गोवंशाच्या जनावरांचे मांस ठेवल्याची माहिती नशिराबाद पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता कारवाई केली. यावेळी हे मांस विक्री साठी आणून ठेवल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम खान हयात खान याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ योगेश वराडे हे करीत आहे.




