जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार गावात राहणाऱ्या एका तरूणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना २८ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील बोरनार गावात राकेश जगन्नाथ पाटील वय ३८ रा. बोरनार ता. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान, जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे प्रेम गोपाल धनगर व सोबत असेलेले चेतन आणि रोहित यांनी रविवारी २८ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या राकेश पाटील याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणारे प्रेाम गोपाल धनगर व त्याचे मित्र चेतन आणि रोहित या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ हे करीत आहे.




