डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपपत्र उद्या दाखल होण्याची शक्यता

dr.payal tadavi

 

मुंबई (वृत्तसंस्था) डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणासंबंधी आरोपपत्र उद्या सत्र न्यायालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती क्राइम ब्रांचने हायकोर्टात दिलीय. दरम्यान, तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जावर आज झालेली सुनावणी हायकोर्टाने आता २५ जुलैपर्यंत तहकूब केली आहे.

 

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवीने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा (२८), डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) या तिघींनी जातिवाचक टोमणे मारून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. तिघींनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने ते फेटाळले होते. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात तिघींनी हायकोर्टात अपिल केले आहे. हायकोर्टाने आज तिघींच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारपर्यंत (२५ जुलै) तहकूब केली आहे.

Protected Content