Home क्राईम चाळीसगावात गोळीबार; दोन राऊंड फायर केल्याने तरूण जखमी !

चाळीसगावात गोळीबार; दोन राऊंड फायर केल्याने तरूण जखमी !

0
285


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जुन्या वादाचे रूपांतर जीवेघेणा हल्ल्यात झाले असून, एका तरुणावर सलग दोन राऊंड फायर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास कोळी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास जेव्हा स्टेशन परिसरात शुकशुकाट होता, तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी रोहिदासला गाठले. कोणताही विचार न करता जुन्या वादातून हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन वेळा फायर करण्यात आले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी झालेल्या रोहिदासला तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी तातडीने धाव घेत परिसराची नाकेबंदी केली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी पोलिसांनी नाशिक किंवा धुळे येथून ‘फॉरेन्सिक’ पथकाला पाचारण केले असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पोलीसांकडून शोध घेतला जात आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


Protected Content

Play sound