Home Cities अमळनेर शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; अमळनेर तालुक्यातील घटना !

शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; अमळनेर तालुक्यातील घटना !

0
113


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने शेत शिवारातून फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात पिडीत मुलगी ही आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहे. मंगळवारी १६ डिसेंबर रोजी पिडीत मुलगी ही तिच्या वडीलांसोबत कोळंबु शिवारातील शेतात कापूस वेचण्यासाठी बकऱ्यांना घेवून गेले होते. त्यावेळी दुपारी २ वाजेच्या सुमारास तिचे वडील बकऱ्या चारण्यासाठी घेवून गेले. त्यामुळे मुलगी ही शेतात कापूस वेचत होते. अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या वडीलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound