Home क्राईम अश्लिल चाळे करत महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

अश्लिल चाळे करत महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

0
153


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात २८ वर्षीय महिला ही बुधवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घरी असतांना संशयित आरोपी अक्षय पांडूरंग मिस्तरी वय २५ रा. पिंप्राळा याने महिलेचा हात पकडून घरात ओढले त्यानंतर अश्लिल चाळे करत त्यांचा विनयभंग केला. या प्रकारानंतर पिडीत महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी अक्षय मिस्तरी याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार हे करीत आहे.


Protected Content

Play sound