Home क्राईम जुन्या भांडणाची कुरापत : दोन जणांना बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी...

जुन्या भांडणाची कुरापत : दोन जणांना बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी !

0
136

चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन जणांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत भास्कर पाटील वय ५९ रा. शिवकॉलनी, चोपडा हे आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहेत. सोमवारी १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शशिकांत पाटील हे त्यांचे सहकारी गणेश राजेंद्र पाटील यांच्यासोबत गप्पा मारत होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपी विजय आंबादास पाटील रा. शिवकॉलनी, जळगाव याने शिवीगाळ करत दोघांना मारहाण केली. तसेच गणेश पाटील याला जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली आहे. याप्रकरणी शशिकांत पाटील यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारा संशयित आरोपी विजय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि सुजीत पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound