Home Cities जळगाव भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे अंतर्गत समुपदेशन समिती पुणे शाखेचा उद्घाटन...

भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे अंतर्गत समुपदेशन समिती पुणे शाखेचा उद्घाटन सोहळा

0
125

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समुपदेशन समितीच्या पुणे शाखेचा उद्घाटन समारंभ शनिवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सेंट क्रीस्पिन्स होम, नळ स्टॉप, कर्वे रोड, पुणे येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील कुटुंबव्यवस्था, विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन तसेच समाजप्रबोधनासाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक श्री. ललितकुमार पाटील, अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि सचिव अ‍ॅड. संजय राणे यांची उपस्थिती लाभली. यांच्यासह डॉ. वर्षा पाटील, सुहास चौधरी, चंद्रकांत नेमाडे, दिनकर फिरके, विनया जंगले, नम्रता भोळे, मोनिका महाजन, छाया चौधरी, पूर्वा चौधरी, डॉ. संजय झोपे, प्रतिभा राणे, डिगंबर महाजन, देवेंद्र भारंबे, देवेंद्र पाटील, डॉ. परमानंद राणे, निलेश बहाटे, सचिन बोरोले, जगदिश फिरके आणि तुषार कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुणे शाखेचे प्रतिनिधी डॉ. संजय झोपे यांनी प्रास्ताविक सादर करत समुपदेशन समिती, पुणे शाखेची भूमिका, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. समाजातील कुटुंबसंवाद अधिक सुदृढ करण्यासाठी तसेच वैवाहिक आयुष्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी ही शाखा प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समुपदेशन समिती, पुणे शाखेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “लग्न या विषयावर बोलू काही” या कार्यशाळेबाबत प्रतिभा राणे यांनी माहिती दिली. विवाहपूर्व सुसंवाद, परस्पर समज आणि जबाबदारीची जाणीव वाढवण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. याचवेळी समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘लेवा विश्वम’ या नियोजित ऑनलाइन डिरेक्टरीविषयी श्री. देवेंद्र भारंबे यांनी मार्गदर्शन केले आणि या माध्यमातून समाजातील व्यक्ती, संस्था व सेवा एका व्यासपीठावर आणण्याचा उद्देश स्पष्ट केला.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळा आणि ऑनलाइन डिरेक्टरीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. भोरगाव लेवा पंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून समाजातील समुपदेशन, कुटुंबसंवाद, विवाहपूर्व व विवाहोत्तर मार्गदर्शन या विषयांवर पुणे शाखा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधत विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक आणि विचारप्रवर्तक चर्चा झाली.

या उद्घाटन समारंभास पुणे शाखेचे सर्व सदस्य, विविध मंडळांचे व शाखांचे पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound