Home क्राईम जळगाव हादरले : धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा खून !

जळगाव हादरले : धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा खून !

0
528


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात सागर साहेबराव सोनवणे या तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, निमखेडी परिसरात काळ रात्री तरुणाचा खून झाला. मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात वार करून त्याला जखमी अवस्थेत फेकून दिले होते. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी सागरला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या खून प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात काळीज चिरणारा आक्रोश केला होता.


Protected Content

Play sound