अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर-चोपडा मार्गावर गडखांब गावाजवळ दहिवद फाट्यापूर्वी झालेल्या भीषण अपघातात एका मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी किशोर मोहन पाटील (वय ४३, रा. घुमावल ता. चोपडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नरेद्र प्रेमराज पाटील (वय ३७, रा. घुमावल ) हे त्यांची डिस्कव्हर मोटारसायकल (क्र. MH-१९-BA-७९८६) घेऊन अमळनेरकडून चोपड्याकडे जात होते. दरम्यान, समोरून चोपड्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. MH-१९-EC-२२१३) वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवले. या पल्सर चालकाने थेट नरेद्र पाटील यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात नरेद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन्ही मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर पल्सर चालक तेथून फरार झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनिल जाधव करत आहे.



