जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिवाळ्यात हाडे व सांध्यांच्या तक्रारी वाढत असल्याने जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात स्थित महादेव हॉस्पिटलमध्ये हाडे व सांध्यांच्या विकारांनी त्रस्त रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन महादेव हॉस्पिटलने विशेष अस्थिरोग बाह्यरुग्ण विभाग (ऑर्थोपेडिक ओपीडी) सुरू केला असून, या सेवेला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जळगावकरांना आता हाडांशी संबंधित उपचारांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला व तातडीची सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होत आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या अस्थिरोग ओपीडीमुळे शहरातील आरोग्यसेवेत महत्त्वाची भर पडली आहे. डॉ. नरेंद्र शिरसाट आणि डॉ. प्रमोद सारखेडवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची सखोल तपासणी करून योग्य व प्रभावी उपचार केले जात आहेत. फ्रॅक्चर, सांधेदुखी, गुडघेदुखी, गादी फाटणे, खुब्यांचे विकार, पायाला बाक येणे, पाठदुखी, कंबरदुखी, चालताना होणारा त्रास, लिगामेंट इन्ज्युरी, खेळात होणाऱ्या दुखापती, ऑस्टिओपोरोसिस, संधिवात तसेच विविध ऑर्थोपेडिक समस्यांवर येथे सल्ला व उपचार दिले जात आहेत.

रुग्णांच्या अचूक निदानासाठी महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक एक्स-रे, एमआरआय तसेच आवश्यक तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वेळेवर आजाराचे निदान होऊन उपचार अधिक परिणामकारक ठरत आहेत. हिवाळ्यात सांधेदुखी व हाडांच्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू शकतात, त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
रुग्णांच्या सोयीसाठी अस्थिरोग ओपीडी सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असून, आपत्कालीन सेवा २४ तास उपलब्ध आहे. विशेषतः अपघातग्रस्त रुग्णांसाठी तातडीची वैद्यकीय मदत मिळत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हाडांच्या कोणत्याही लहान-मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.



