धरणगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

0
111


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून गुरूवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. ही घटना समोर आल्यानंतर तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेश नाईक हे करीत आहे.