Home Cities जळगाव लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम !

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम !

0
116

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त शहरात आज, शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. लाडवंजारी समाज आणि शहरातील सर्वच समाज बांधवांनी या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून गोपीनाथ मुंडे यांच्या ल स्मृतींना अभिवादन केले. यावेळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून झाली. सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात ही रॅली पुढे मार्गस्थ झाली. या रॅलीमध्ये लाडवंजारी समाजासह सर्वपक्षीय नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक या रॅलीत सहभागी झाले होते.

माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जयेश भावसार, राहुल वाघ, विनोद मराठे, महादू सोनवणे, नितीन इंगळे, संदीप ढडोरे, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, माजी महापौर कैलासअप्पा सोनवणे, माजी नगरसेवक भरत सपकाळे, ईबा पटेल, दिपक बाविस्कर, किशोर ढाकणे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, दिलीप लाडवंजारी, संजय घुगे, भूषण लाडवंजारी, राहुल लष्करे, सोमनाथ पाटील, सुभाष लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, राजू वाघ, रवींद्र घुगे, सुनील लाड, किशोर पाटील, नरेंद्र नाईक, भाग्येश ढाकणे, सतीश जायभाये, कमलाकर लाडवंजारी, अशोक कोष्टी, भास्कर लाड, अमोल ढाकणे, रवी सानप, जयराम पाटील, बळीराम पाटील, पप्पू पाटील, संतोष घुगे, मनोजकुमार पाटील, मयूर घुगे, दिनेश ढाकणे, शक्ति महाजन, आनंद सपकाळे, रणजित देशमुख, ऋषिकेश वाघ, राहुल सानप, योगेश नाईक, गौरव घुगे, तेजस वाघ, मोहित घुगे, वैभव वाघ, अजय सांगळे, अमोल वाघ, उज्वल नाईक, भावेश पालवे, देवेंद्र वंजारी, महेश घुगे, विशाल घुगे, राजेंद्र पाटील, अतुल वंजारी,सिद्धेश घुगे, संतोष चाटे, खन्ना पाटील, रामेश्वर पाटील, गोविंदा सांगळे, भगवान लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, किरण नाईक. सचिन इखे, अक्षय सांगळे, तसेच
संस्थेचे पदाधिकारी: अध्यक्ष चंद्रकांत पन्नालाल लाड, सेक्रेटरी प्रवीण सानप, उपाध्यक्ष विजय लाडवंजारी, कैलास सांगळे, आकाश घुगे, नितीन पाटील वंजारी, रितेश लाड वंजारी, गजानन वंजारी, कल्पेश वाघ, मिलिंद आंधळे, कृष्णा सांगळे. अर्चना नाईक, रत्नमाला घुगे पाटील, अलका नाईक, निर्मलाबाई पाटील, सरलाताई पालवे यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत पन्नालाल लाड (अध्यक्ष, लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान, मेहरूण) व माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक (अध्यक्ष, जयंती आयोजन समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. जळगाव व जिल्ह्यातील समिती सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

या भव्य रॅलीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले लेझीम पथक जळगावकरांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या तालावर निघालेली ही मिरवणूक शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण करत होती. यावेळी जळगावात ठिकठिकाणी नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले


Protected Content

Play sound