Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘नोव्हाट्रा 25’ फ्रेशर्स पार्टी उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘नोव्हाट्रा 25’ फ्रेशर्स पार्टी उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित ‘नोव्हाट्रा 25’ फ्रेशर्स पार्टी जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. नव्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत तसेच ज्युनियर-सीनियर यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम विशेष ठरला. कार्यक्रमात मिस्टर फ्रेशर्स म्हणून आदित्य भिरूड तर मिस फ्रेशर्स म्हणून अंकिता खोबरे यांनी किताब पटकावला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. या वेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, विभागप्रमुख तसेच प्राध्यापक उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत उपक्रमांमध्ये सहभाग, टीमवर्क, प्रामाणिकपणा आणि नवोन्मेष यांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना मूर्त रूप देत महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांत सक्रीय राहावे असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी संस्थेचा परिचय देत महाविद्यालयातील विविध प्रगतीशील उपक्रमांची माहिती दिली. फ्रेशर्स कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, सांस्कृतिक प्रस्तुती आणि स्पर्धांमधून आपली कला सादर केली. परीक्षक म्हणून प्रा. तृषाली शिंपी आणि प्रा. पूनम वाणी यांनी भूमिका निभावली. आयोजन बेसिक सायन्सेस अँड ह्यूमानिटीज विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना गवई, हिमांशू चौधरी, अमोलिक जंजाळे, सुमित थिगळे, अनुष्का बर्हाटे, राजश्री पाटील, पावबा पाटील, देवेश पाटील, काजल पाटील, अश्विनी ठाकरे, सुमित पाटील, देवयानी पाटील, साहिल भोळे, सानिका कारंडे आणि गौरी कडू यांनी केले. फ्रेशर्स पार्टीचे यंदाचे विजेते म्हणून इलेक्ट्रिकल विभागातील आदित्य भिरूड आणि संगणक शाखेतील अंकिता खोबरे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप बक्षीस वितरणाने झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे कौतुक केले.


Protected Content

Play sound