चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील ‘रहा अपडेट’ व्हाट्सअप ग्रुपतर्फे राबवण्यात येत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत आज (दि.२२) येथील शेतकरी मनोज सोळंकी यांच्या शेतात ८० झाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी ग्रुपचे सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यामध्ये वर्धमान धाडीवाल, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, लक्ष्मण शिरसाठ, गणेश गवळी, रामलाल मिस्तरी, गजानन महाजन, प्रताप देशमुख, रवींद्र सूर्यवंशी, योगेश शेळके, शरद पाटील, सचिन स्वार, मोहन देशमुख व किरण शेळके यांचा समावेश होता.