जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तैली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीत समाज बांधवांचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग पाहण्यासारखा होता. संतांच्या विचारांचे स्मरण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत रॅलीचे वातावरण ओजस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.

रॅलीची सुरुवात तरुण कुढापा चौक, नेरी नाका येथून ढोल-ताशांच्या गजरात झाली. समाजातील विविध घटकांतील नागरिक, युवक आणि कार्यकर्ते मोटारसायकलवर एकत्र निघाले. पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चित्रा चौक आणि एस. टी. वर्कशॉप मार्गे ही रॅली पुढे सरकत संताजी जगनाडे महाराज बगीचा येथे एकत्रित झाली. रॅली मार्गावरील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सामाजिक ऐक्याचा संदेश दृढ केला.

या प्रसंगी शारदा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, महानगराध्यक्ष मनीषा चौधरी यांसह समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. बेबाबाई सुरळकर, डॉ. सुषमा चौधरी, आशा चौधरी, अनिता चौधरी, जयश्री चौधरी, मेघा चौधरी, दिपाली चौधरी, सरिता चौधरी, सिमरन चौधरी, रूपाली चौधरी, तृप्ती चौधरी, प्रिया चौधरी, रंजना चौधरी, मोहिनी चौधरी आदींसह महिला वर्गानेही उत्साहाने सहभाग नोंदवला.
पुरुष वर्गातून बबन चौधरी, रामचंद्र चौधरी, संदिप चौधरी, मनोज चौधरी, उमेश चौधरी, प्रकाश चौधरी, विशाल दिगंबर पाटील, विनोद चौधरी, पांडुरंग चौधरी, योगराज चौधरी, सतिश चौधरी, शिवाजी चौधरी, दिपक चौधरी, कैलास चौधरी, हरेश्र्वर चौधरी, चेतन चौधरी, स्वप्नील चौधरी, पंकज चौधरी, आशिष चौधरी, मंगेश चौधरी, मयुर चौधरी, बापू चौधरी, शरद चौधरी, राजेंद्र चौधरी, गोरख चौधरी, निखिल चौधरी, रविंद्र तायडे, सुभाष चिंधू चौधरी, विलास चौधरी, दिलीप चौधरी, मनोज बापू चौधरी, दुर्गेश चौधरी, धनंजय चौधरी, अविनाश चौधरी, प्रमोद चौधरी, सचिन चौधरी, कन्हैया चौधरी, हेमंत पाटील, मनोज आप्पा चौधरी, बाळू भाऊ चौधरी, दपाडू चौधरी, प्रसाद चौधरी, प्रकाश ओंकार चौधरी, विजय चौधरी, अॅड. चंद्रकांत चौधरी, तुषार पाटील, विक्की चौधरी, संजय चौधरी, हरीश तेली, लक्ष्मण चौधरी, गणेश चौधरी, भूषण चौधरी, हर्षल चौधरी, रोहित चौधरी, निलेश चौधरी, रत्नाकर चौधरी यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



