फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील स्वामी नारायण मंदीर परिसरात एका वृध्द महिलेच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रूपये किंमतीची गळ्यातील सोन्याची चैन जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी रविवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शारदा प्रदिप चौधरी वय ६४ रा. लक्ष्मीनगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता वृध्द महिला ह्या स्वामी नारायण मंदीरासमोर पायी जात असतांना अज्ञात दोन जण दुचाकीवर येवून त्यांनी महिलेच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाची १ लाख ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लांबविली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दिन हबीब सैय्यद हे करीत आहे.




